नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर, ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रेम मिळालं तर नशीब, नाहीतर…’ या हळुवार ओळीने प्रेमाची एक नवी, निरागस कहाणी सांगणाऱ्या ‘धप्पा’ या आगामी मराठी चित्रपटाच फर्स्ट पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘वृंदावन एंटरटेनमेंट अँड फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटातून नवोदित कलाकारांची जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम हे नवोदित कलाकार पहिल्यांदाच या चित्रपटामार्फत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘धप्पा’च्या पोस्टरमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीचा सुंदर साज आणि त्यात फुलणारं निरागस प्रेम पाहायला मिळणार असल्याचं पोस्टरवरून कळतंय. प्रेम, मैत्री, नात्यांमधील भावनिक गुंफण आणि तरुणाईच्या मनातील हळुवार भावना या सगळ्यांचा सुंदर…

Read More